‘‘डोगरांच्या बाबतीत नेहमी असेच घडते. तुम्ही त्यांच्या सानिध्यात अनेक वर्ष राहिलात की तुम्ही त्यांचे होऊन जाता. तुमची त्यातून सुटका नाही.’’ – रस्किन बाँड

डोगरांसंबंधी इतके सकारात्मक विचार, त्यांचे भव्य स्वरूप, जंगले, गावं आणि शहरांना सामावून सामाऊन घेणारे त्यांचे चित्ताकर्षक दृश्य, ह्या सर्वांची इतकी चांगली गुंफण झाली आहे की कदाचित डोंगरांशिवाय त्यांचे अस्तित्वच नगण्य बनले असते. त्यांच्या वैभवामुळे कदाचित डोंगर हे अनेक कथानकांचा विषय बनले आहेत, आणि आता तर साहित्य महोत्सवाचे ते स्थान देखील बनले आहेत. उत्तराखंडातील कुनाऊँ भागातील धानाचुली आणि नैनिताल भागात असाच एक महोत्सव होत आहे.

 व्यवसायाने कॉर्पोरेट व पॉलिसी लॉयर असलेल्या सुमंत बात्रा यांची संकल्पना ह्या कुमाऊँ साहित्य महोत्सवाला चार सक्षम महिला लेखिका व प्रकाशकांचे सहकार्य मिळाले आहे. जान्हवी प्रसाद, किरण मनराल, प्रिया कपूर आणि सुजाता पराशर ह्या नव्या संकल्पनेच्या पाठीशी आहेत आणि त्या सल्लागार मंडळाच्या (इतरांसह) सदस्या आहेत आणि हा साहित्य महोत्सव प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांनी खूप महत्त्वाचे योगदान दिले आहे असे सुमंत सांगतात.

सुमंत सांगतात की, ‘‘माझ्यापाशी केएलएफ साठी अतिशय प्रेरणादायी व्हिजन आहे आणि ते प्रत्यक्षात उतरविण्यासाठी एक सक्षम सहकार्यांची तुकडी असणे अतिशय महत्त्वाचे होते. मी जेव्हा माझ्या मनात केएलएफच्या रचनेविषयी विचार करू लागलो तेव्हा किरण, जान्हवी, प्रिया आणि सुजाता यांची नावे डोळ्यासमोर आली ज्या एक योग्य आधारस्तंभ बनू शकत होत्या आणि ज्यांच्यावर ह्या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी विश्वास आणि भरवसा टाकता येणार होता. त्या अतिशय भरवशाने काम करणा-या, व्यावसायिक  आणि चैतन्यपूर्ण आहे आणि तरी सुद्धा विनम्र आहेत. केएलएफला त्यांचे कौशल्य, अनुभव आणि प्रतिष्ठा यांचा झालेला फायदा अप्रतिम आहे. सैफ महमद आणि ॠषी सुरी ह्या केएलएफच्या प्लॅनिंगच्या बोर्डावरील इतर सहका-यांसह एक सक्षम कार्यबळ निर्माण झाले आहे.’’

 

Women at Kumaon Lit Fest
Women at Kumaon Lit Fest

 

जान्हवी ह्या सध्या महात्मा गांधींच्या आत्मचरित्रावर आधारित सत्याचा माझा अनुभव ह्याविषयावर एक ललित कादंबरी लिहित आहेत आणि त्या अॅबटसफोर्ड, नैनिताल ह्या महोत्सवाच्या दुस-या ठिकाणच्या यजमान देखील आहेत (पहिला महोत्सव टे अरोहा, धनचुली येथे आहे).  हे ठिकाण म्हणजे त्यांच्या कुटुंबियांनी 1903 मध्ये घेतलेला विलक्षण इंग्लिश लॉज आहे.

त्या सांगतात, ‘‘तीन एकरांच्या इस्टेटीत आम्ही वाढलो. ताजी हवा, निळे आकाश, धुक्याने दाटलेले आकाश, सुंदर पक्षी, जंगली फळे, जंगलातील फेरफटका, पिकनिक्स, बाहेर जेवण करणे, चांदण्या पाहणे आणि फळांनी लगडलेल्या झाडांवर चढणे असा आनंद आम्ही घेतला. त्यानंतर आम्ही पुढच्या अभ्यासासाठी शहरात गेलो आणि करिअर केले.  पण मी फोटोग्राफीसाठी, गांधींवर माझी कादंबरी लिहिण्यासाठी  येत असते (नोव्हेंबर हार्पर  यांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे) आणि ह्या प्रॉपर्टीचा लोकांना कसा अनुभव घेण्यासाठी उपयोग करून देऊ शकते जो मी मोठी होताना घेतला आहे.’’ आता केएलएफमुळे जान्हवी यांच्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देता येणार आहे अनेक प्रेक्षकांबरोबर त्यांचा अनुभव इतरांना देता येणार आहे.

केएलएफ मध्ये अनपेक्षितची अपेक्षा – सुजाता

प्रिया कपूर, रोली बुक्सच्या संपादकीय संचालक, सांगतात, की ह्या साहित्य महोत्सवात ह्या बौद्धिक खजान्यातून काही तरी नक्की मिळेल. ह्या महोत्सवाच्या सुंदर आणि प्रेरणादायी स्थानाचा विचार केला तर एक मेजवानी मिळेल अशा प्रकारे त्याची रचना करण्यात आली आहे. जेथे आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनातून थोडी विश्रांती घेऊन आपण खरोखर आपली आवड जोपासणा-या अशा उपक्रमात सहभागी होऊ शकतो.

‘‘साहित्यापासून ते संस्कृती, संगीत आणि खाद्यपदार्थापर्यंते, ह्या महोत्सवात प्रत्येकासाठी काही तरी आहे. हे आमचे पहिलेच वर्ष असल्यामुळे, आम्ही नात प्रस्थापित करत आहोत आणि दरवर्षी आमच्या ह्या उपक्रमाला पाठबळ देणा-या प्रामाणिक आश्रयदात्यांच्या प्रतिक्षेत आहोत,’’ त्या सांगतात.

देशातील प्रकाशन उद्योगात लेखिका, साहित्याच्या एजन्टस, प्रकाशक वगैरेसार‘या महत्त्वाच्या भूमिका महिला बजावत असताना लेखक आणि मंडळाच्या सदस्या किरण मनरल सांगतात की साहित्याच्या क्षेत्रात महिलांनी दिलेल्या कथा त्यांच्या स्वत:च्या मतानुसार स्वीकारल्या जात आहेत – आणि केएलएफच्या पॅनलवरील महिलांच्या आणि ह्या कार्यक्रमाच्या वक्त्यांमधील प्रतिनिधित्वावरून हे दिसून येते.

एकुण 107 सहभागी लेखकांपैकी 55 महिला वक्त्या आहेत.

लेखिका आणि मंडळाच्या सदस्या सुजाता पराशर सांगतात, ‘‘अधिकाधिक महिला शिक्षित होत आहेत आणि आर्थिक बाबतीत स्वतंत्र होत आहेत. परिणामस्वरूप त्या अधिक मुक्त बोलणा-या,  धीट आणि अधिक भावना व्यक्त करत आहेत. आणि समकालीन महिला लेखिका लिहित असलेल्या पुस्तकांवरून हा पैलू दिसून येत आहे. सर्वसमावेशक अशा केएलएफच्या व्हिजननुसार सर्व सत्रांमध्ये लोकप्रिय आणि उत्तम महिला वक्त्यांचा समावेश करण्यात येत आहे.’’ मंडळाच्या मतानुसार ह्या कार्यक्रमात साहित्याच्या क्षेत्रात महिलांचे अधिपत्य आहे. ‘‘एकुण 107 सहभागी लेखकांपैकी 55 महिला वक्त्या आहेत आणि 52 पुरूष आहेत. किती छान नाही?’’

एक अप्रतिम, अनुभवजन्य महोत्सव होईल अशा प्रकारे केएलएफची आखणी करण्यात आली आहे – किरण

केएलएफमध्ये कलाकार, निर्णयक्षम व्यक्ती, इतिहासकार, चित्रपट निर्माते, संगीतकार, कलेचे संवर्धक, प्रशिक्षक, प्रेरणादायी वक्ते यांचा समावेश असून ते ह्या महोत्सवात बोलणार आहेत. किरण पुढे सांगतात, ‘‘एक अप्रतिम, अनुभवजन्य महोत्सव होईल अशा प्रकारे केएलएफची आखणी करण्यात आली आहे ज्यात प्रेक्षक मर्यादित आहेत, सुसंवाद हा महोत्सवाचा महत्त्वाचा भाग आहे आणि ह्यात वेगवेगळ्या क्षेत्रातील, भाषांचे आणि संप्रदायाचे लेखक आहेत. जेथे कला आणि सृजनशीलतेला खतपाणी मिळेल अशा सर्व शाखांना एकत्र आणणे आणि बंदिस्त विचारसरणीऐवजी विविध प्रकारचे विचारप्रवाह एकत्र आणणे हे ह्यामागचे उद्दिष्ट आहे.’’

कुमाऊँ प्रांताला सांस्कृतिक प्रकाशझोतात आणणे हा देखील ह्या महोत्सवाचा उद्देश आहे.  उपजत साहित्यिक अंग आणि कलेचा आविष्कार असलेले विद्यार्थी शोधण्यासाठी केएलएफ शाळांशी देखील संपर्क साधणार आहे आणि त्यांना त्यांची कला सादर करण्याची संधी देखील देण्याचा उद्देश आहे. त्यामुळे त्यांना अधिक प्रकर्षाने त्यांची कला जोपासण्यास प्रेरणा मिळू शकेल. केएलएफमध्ये स्थानिक कवी, कथाकथन करणा-या व्यक्ती आणि लेखक हे देखील ह्या कार्यक्रमात भाग घेतील.

समारोप करताना सुजाता सांगतात, ‘‘ह्या महोत्सवाचे सगळेच काही वैशिष्ट्यपूर्ण आणि आगळेवेगळे आहे, मानसिकतेपासून ते अनुभवापर्यंत. परंतु काही अडचणी सोडल्या तर प्रत्येक सत्राची ज्या पद्धतीने आखणी करण्यात आली आहे त्याने मला खूप उत्कंठा वाटत आहे.  खरं तर अनपेक्षितचीच जास्त अपेक्षा आहे!’’