लिसा एसराव ह्या एक अग्रणी व कुशाग्र महिला असून पाच वर्षांपुर्वी त्यांनी देशातील पुरूषांचे वर्चस्व असलेल्या क्षेत्रात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आणि तेव्हापासून त्यांची कंपनी बॅँडस बिव्हरेजेसने सहा पारितोषिके जिंकली असून त्यांची उलाढाल दरवर्षी दुप्पट होत आहे.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या स्वप्नांवर विश्वास ठेवा

लिसा यांच्या प्रवासाला 2003 साली सुरूवात झाली, जेव्हा पती आणि दोन मुलांसह त्यांनी यूकेवरून भारतात स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला. तत्पुर्वी त्या लंडनमध्ये प्रसिद्धी माध्यमांमध्ये काम करत होत्या. त्या सांगतात, ‘‘मला माझे पर्याय खुले ठेवायचे होते. माझ्या मुलांबरोबर जगायचे होते आणि त्याचबरोबर स्वत:चा व्यवसाय सुरू करायचा होता.‘‘

भारत लिकर व्यवसायात महिलांचे नेतृत्व पाहण्यास सज्ज आहे?

भरपूर संशोधन केल्यानंतर लिसा यांच्या असे लक्षात आले की भारतीय बाजारपेठेत अजून परदेशी उच्च दर्जाची आली नाहीत – एकतर प्रचंड आयात करामुळे ती खूप महाग आहेत किंवा ती योग्य नाहीत. लिकर उद्योगात प्रवेश करण्याच्या त्यांच्या निर्णयाला असे कारण होते की यूके मध्ये डबल डच हा त्यांच्या वडिलांच्या मालकीचा एक बियर ब्रँड  होता आणि त्यांचा यूके आणि संपूर्ण जगातील दर्जेदार लिकरशी संबंध आला होता. त्यामुळे अशाच प्रकारच्या उत्पादनांना भारतात बाजारपेठ उपलब्ध करून द्यायची होती.

‘‘ह्या उद्देशाने, मी संपूर्ण देशातील ब्रुवरीज आणि डिस्टिलरीजना भेट देण्यास सुरूवात केली. मी अशा एका ठिकाणाच्या शोधात होते जेथे मला हवे ते मिळेल,’’ लिसा सांगतात.  त्यांनी आपले स्वप्न साकार करण्यासाठी पतीसह स्वत:ची सर्व शिल्लक रक्कम खर्च केली होती.

परंतु, एका स्त्रीने लिकर व्यवसायाचे नेतृत्व करण्यास भारत तयार होता का?

‘‘कोणी माझे नीट ऐकून घेतले नाही आणि माझे उत्पादन बाजारपेठेत आणण्यासाठी मला वितरकांना पैसे द्यावे लागतील,’’ त्या सांगतात.

‘ठेकेदारी’ संस्कृतीमुळे ही गोष्ट अजून कठिण झाली आणि अल्कोहोल आयात करण्यासाठी भारताच्या प्रत्येक राज्यात नियम, अबकारी कर वगैरे वेगवेगळे आहेत. तरी सुद्धा ब्रँडस अॅण्ड बिव्हरेजेस ह्या ब्रँडची उत्पादने आता (ते दोन प्रकारची व्हिस्की, रम आणि ब्रँडी बनवितात) 11 राज्यांमध्ये पोहोचली आहेत आणि लवकरच त्यांची कंबोडिया व व्हिएतनामला निर्यात करण्यात येईल.

तुम्ही कुटुंबाबरोबर पण राहू शकता आणि आनंद उपभोगू शकता.

लिसा आपल्या कर्मचा-यांनी हे प्रत्यक्षात उतरविण्यास मदत केल्याबद्दल त्यांचे कौतूक करतात, त्यांना असे वाटते की व्यावसायिकाने खूप संशोधन करून त्यांचा व्यवसाय योग्य आहे का हे पहावे लागते.

‘‘पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे, तुमच्या स्वप्नांवर विश्वास ठेवा. खास करून महिलासाठी तुम्ही कुटुंबाबरोबर राहू शकता आणि तुम्हाला हवे ते देखील करू शकता. तुम्ही केलेल्या निवडीबद्दल जरी कोणी नापसंती व्यक्त केली तरी थांबू नका,’’ त्या पुढे सांगतात.